मारुती चितमपल्ली यांचे लेखन म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा- डॉ. बी.एम.हिर्डेकर ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे उद्घाटन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मारुती चितमपल्ली यांचे लेखन म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा असे प्रतिपादन डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय येथे मराठी विभाग आयोजित ‘मारुती चित्तमपल्ली यांच्या साहित्यावरील भित्तिपत्रकाच्या ‘ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मारुती चित्तमपल्ली हे जसे उत्तम लेखक होते तसे वन्यजीव अभ्यासकही होते. त्यांचे लेखन म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवांचा खजिना आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवाजीराव महादेव होडगे म्हणाले की, चितमपल्ली हे जंगलातील प्राणीजीवन आणि निसर्गाचे बारकावे रेखाटणारे, ओघवत्या शैलीत अनुभव कथन करणारे लेखक होते त्यामुळे त्यांचे लेखन हे वाचनीय आणि लोकप्रिय बनले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुखदेव एकल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोहम डाफळे तर आभार प्रा. आर. एस. पाटील यांनी मानले. सदरचे भित्तीपत्रक कु. चंदना भराडे, मेघा कांबळे, साऊताई कळमकर, अक्षता खराडे, प्रणाली भराडे, राहुल मगदू या विद्यार्थ्यांनी तयार केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. ए.डी. जोशी, प्रा. एम.एस. पाटील, प्रा. फराक्टे, प्रा. डी.पी. साळुंखे, प्रा. नितेश रायकर, प्रा. टी.एच. सातपुते, प्रा. विनोद प्रधान तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.