ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.एस. आर. रंगनाथन हे ग्रंथालय विज्ञानाचे जनक : प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात रंगनाथन जयंती साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

डॉ.एस. आर. रंगनाथन हे ग्रंथालय विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शिवाजीराव होडगे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील महात्मा फुले ग्रंथालय आयोजित डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्राचार्य बोलताना पुढे म्हणाले की, रंगनाथन यांनी आयुष्यभर ग्रंथालयासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या योगदानाचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांवर पडलेला दिसतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय प्रमुख टी. एच. सातपुते यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये रंगनाथन यांच्या लायब्ररी सायन्सच्या पाच नियमांची विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे आभार ग्रंथालय परिचर सातापा कांबळे बस्तवडेकर यांनी मांडले याप्रसंगी ग्रंथालय परिचर सदाशिव गिरी बुवा , तसेच प्रा. डी.पी. साळुंखे डॉ. सुखदेव एकल, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. सोहम डाफळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks