ताज्या बातम्यामहाराष्ट्र
डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांना ‘मुरगूड भूषण ‘ पुरस्कार जाहीर ; एम.जे. लकी सोशल आणि एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पुरस्काराची घोषणा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील पहिला मुरगूड भूषण पुरस्कारसाठी आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख (काका) यांना जाहीर करण्यात आला आहे. एम. जे. लकी सोशल आणि एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्काराचे वितरण शुक्रवार १५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. दत्तप्रसाद मल्टीपर्पज हॉल नाका नं. १ येथे पुरस्कारचे वितरण शिवम प्रतिष्ठान कराडचे इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी यशस्वी उद्योजक म्हणून मोहन कृष्णा गुजर तर जिजामाता पुरस्कार श्रीमती सरिता बाजीराव साळुंखे यांनाही देण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.