ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल :  ‘शाहू’ च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार व कनिष्ठ गटात १६० मल्लांची नोंदणी, सलग दोन दिवस स्पर्धेस मल्लांसह कुस्ती शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; रविवारी (ता.१०)पुरुषांच्या सिनियर व महिला गटातील लढती

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार गटात ९७ तर कनिष्ठ गटात ६३अशा १६०मल्लांची नोंदणी झाली. पहिल्या दिवशी झालेल्या बालगटासह या गटातील लढतींना मल्लांसह कुस्ती शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी या स्पर्धा सुरू केल्या. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून या स्पर्धा सलग ३९व्या वर्षी संपन्न होत आहेत.

दरम्यान पहिल्या दिवशीच्या बालगटातील व आजच्या कुमार व कनिष्ठ गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या दोन विजेत्यांच्या अंतिम लढती पूर्ण झाल्या.

रविवारी (ता.१०)पुरुषांच्या सिनियर व महिला गटातील लढती होतील. महाखेल – कुस्ती हेच जीवन या फेसबुक पेज व युट्यूब चॕनेलवरून कुस्ती स्पर्धेच्याऑनलाइन प्रक्षेपणासही शौकिनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बालगटातील पहिल्या दोन क्रमांकासाठी अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या व तिसरा क्रमांक प्राप्त केलेल्या दोन मल्लांची अनुक्रमे नावे अशी आहेत.

२४ किलो गट – संचित पाटील (मळगे खुर्द ),विनायक चव्हाण (शिंदेवाडी), तन्मय शिंगाडे, वेदांत मुरगुडे (दोघेही तळंदगे).

२६ किलो गट– अथर्व मोरे (उचगांव), विश्वजीत शिणागारे (तळदंगे), आयुष पाटील( सिद्धनेर्ली), श्रेयस पाटील (केनवडे).

२८ किलो गट- श्रीतेज मगदूम (सिद्धनेर्ली ), सार्थक पाटील (म्हाकवे), आदर्श सुतार(बेलवळे बुद्रुक), जय चौगुले (एकोंडी).

३० किलो गट- अर्जुन कोळेकर, संग्राम शिणगारे(दोघेही तळंदगे ),राजवीर कुंभार (एकोंडी), अनिल पाटील (बेलवळे बुद्रुक).

३२ किलो गट- करण तोडकर (द. वडगाव), रुद्राक्ष तळेकर (केनवडे), साईराज सुळगावे (एकोंडी), आरमान पैलवान( मुरगूड).

३६ किलो गट- शार्दुल बोडके( पिंपळगाव खुर्द),शिवरुद्र चौगुले(एकोंडी),शिवेंद्रकुमार पाटील (बामणी), श्रेयस दिवटे (मुरगुड).

३८ किलो गट- विकास गोरडे (शेंडूर ),हर्षल चौगुले (नंदगाव), यश खोंद्रे (एकोंडी), ओम हासबे (मुरगुड).

४१ किलो गट -आदर्श पोवार (यळगुड), पृथ्वीराज मोहिते (कोगील बुद्रुक), सुहास पाटील (व्हनाळी), संस्कार माने(सिद्धनेर्ली)

स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी कार्यकारी समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव पाटील, भैरवनाथ आरेकर, शौकत जमादार, दिलीप तोरासे, शिवाजी पाटील, संजय वाडकर, राजू बोंद्रे, कृष्णात सुळकुडे, आप्पासो निकम, संतोष गुजर, सचिन पाटील, रणजीत डेळेकर, महेश पाटील, प्रसाद पाटील, शैलेश पाटील, अमर चौगुले ,दत्तात्रय एकशिंगे, विजय नाईक, अजीत पाटील आदींसह संयोजन समिती काम करीत आहे.

 

चित्रमय इतिहास ‘शाहू’च्या कुस्तीतील योगदानाचा…

स्पर्धास्थळी संयोजकांनी ‘शाहू’मार्फत घेण्यात येणाऱ्या मॕटवरील व मातीतील कुस्ती मैदानाची क्षणचित्रे,राबविण्यात येणारे विविध उपक्रम,मान्यवरांची उपस्थिती,कारखाना मानधनधारक खेळाडूंची पदके व प्रशस्तीपत्रके यांची झलक दर्शविणारे जुने फोटो स्वतंत्र दालनात लावले आहेत.यामध्ये स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख,हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितांचेही फोटो कारखाना मानधनधारक खेळाडूंची पदके व प्रशस्तीपत्रके आहेत.शौकिनांनी या दालनास भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks