ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज शहरातील वीज पुरवठा सोमवार दिवशी बंद करू नये : गडहिंग्लज शिवसेना ठाकरे गटाची मागणी

गडहिंग्लज प्रतिनिधी: राजेंद्र यादव

गडहिंग्लज शहरात महावितरण कडून आठवड्याच्या दर सोमवारी वीज पुरवठा खंडित करण्यात येत असतो याचा नागरिकांना खूप त्रास होत आहे.सध्या सात दिवसांच्या आठवडे ऐवजी पाच च दिवसाचा आठवडा सुरू करण्यात आलेला आहे.

त्यामुळे शासकीय कार्यालये, बँका,शासकीय, खाजगी संस्था , शुक्रवार दिवशी बंद झाल्यानंतर त्या थेट सोमवारी सुरू केल्या जातात. पण महावितरण कंपनी कडून सोमवारी वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने शासकीय खाजगी कार्यालयातील कामे पूर्णपणे थांबविली जातात त्यामुळे फक्त चार दिवसांचा आठवडा झाल्याने अशा स्थितीत कामे होणार कशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गडहिंग्लज शहरात गावातील शंभर पेक्षा जास्त नागरिक कामा निम्मित येत असतात. दर सोमवारी वेग वेगळ्या कार्यालयामध्ये गर्दी होत असते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी हजर असतात पण वीज पुरवठा चालू नसतो त्यामुळे पुन्हा सर्वर डाउन, नेटवर्क नसणे अशा समस्या उद्धभवतात.सोमवारी वीज पुरवठा बंद व मंगळवारी बाजार पेठ बंद याचा फटका सामान्य नागरिकांसह व्यापारांना देखील बसत असतो.

ग्रामीण भागातील निर्माण होणाऱ्या समस्या या वेगळ्या आहेत .वीज पुरवठा बंद असल्याने शासकीय खाजगी ,इतर कामांकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स काढून देणे ,टायपिंग करून देणे इत्यादी कामासाठी नागरिकांचे कडून जास्त पैसे आकारले जातात.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो या सर्व बाबींचा विचार महावतीरण ने करून सोमवार चा दिवस सोडून इतर दिवशी वीज पुरवठा बंद ठेवण्यात यावा अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीने निवेदन द्वारे महावितरण अभियंता यांच्या कडे करण्यात आली.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख अजित खोत,युवराज पोवार, श्री शैल्लपा साखरे,प्रकाश रावळ,दिगंबर पाटील ,सुधाकर जगताप,मारुती जाधव , वसंत नाईक,संभाजी येडूरकर,संकेत रावण,तुकाराम वाघराळकर विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks