ताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्याकरण म्हणजे सर्व भाषेचा पाया : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे उद्घाटन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत नवे शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यास‌क्रमावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले.

बी. ए. भाग १ च्या कु. भार्गवी रणजीत कदम हिने उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विषय शिक्षक लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी प्रास्ताविक सादर करताना भित्तीपत्रकाचे अभ्यासपूरक उपक्रम म्हणून विद्याथ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्व विशद केले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. होडगे यांनी भित्तीपत्रके तयार केलेल्या विद्यार्थ्यांचे व इंग्रजी विभागाच्या प्रा. प्रधान यांचे कौतुक केले. प्रत्येक भाषेतील व्याकरण हा त्या भाषेचा पाया असतो आणि तो भक्कम झाला, तरच विविध भाषिक कौशल्यांवर आपण प्रभुत्व मिळवू शकतो असे ते म्हणाले. मोबाईलच्या युगात पायाभूत शिक्षण दुरावत चालेले असताना इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या भित्तीपत्रक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. असेच विद्यार्थी सहभाग असणारे उपक्रम प्रत्येक विभागाने घ्यावेत असे ते म्हणाले. यानंतर बी. ए. भाग १ च्या कु. पूजा अरविंद राऊत हिने कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी बी. ए. भाग १ च्या कु. भार्गवी रणजीत कदम, कु. पूजा अरविंद राऊत, कु. श्रध्दा संदीप सुतार, कु. क्षितिजा टिकले आणि बी. कॉम. भाग १ च्या कु. वैष्णवी गणेश शिंदे या विद्यार्थिनींनी भित्तीपत्रके तयार केली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. पोवार, आर्टस् फॅकल्टी हेड प्रा. डॉ. सौ. पाटील, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोहनी, डॉ. अशोक पाटील, भूगोल विभागप्रमुख प्रा. डी. ए. सरदेसाई, प्रा. नितेश रायकर, प्रा. सुहास गोरुले, प्रा. सौ. अर्चना कांबळे, बी.ए. व बी. कॉम. चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks