लक्ष्मीनारायण संस्था सभासदांना लाभांशापोटी २७ लाख ०७ हजारांचे वाटप ; १५ टक्के लांभाशाची घोषणा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील सुवर्णमहोत्सची श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या सन २०२४/२५ या अर्थिक वर्षातील २ कोटी ७२ लाख ०१ हजारांच्या विक्रमी निव्वळ नफ्यातून सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असून त्याद्वारे २९ लाख ०९ हजारांचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा संस्था सभापती श्री किशोर पोतदार यांनी केली ते ५९ व्या वार्षिक सभेत बोलत होते.
यावेळी सभापती म्हणाले, “संस्थेने गेल्या अहवाल सालात ५९५ कोटी ९२ लाखांचा विक्रमी व्यवसाय केला असून त्यात १२२ कोटी ४३ लाखांच्या ठेवीच्या आधारे ९० कोटी ०२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे त्यापैकी ५३ कोटी ४० लाखांचे कर्ज हे सोनेतारणा वरील आहे.” व दि ३१ मार्च २०२५ नंतर ४ महीन्यातील संस्थेच्या प्रगतीचीही माहिती दिली तसेच चालू वर्षी संस्थेच्या ३१ लाख रुपयाचा संस्था महोत्सव निधी अंतर्गत सभासदांना दिपावली भेट वस्तू देण्याचा संकल्प आहे तसेच त्यांनी ३१ मार्च २०२६ ३ अखेर १५० कोटी ठेवी, १०५ कोटी कर्जे व ३ कोटी नफा करणेचे उदिष्टे ठेवलेले आहे.
संस्थेचे संस्थापक संचालक जवाहर शहा यांनी संस्था स्थापनेपासुनची माहिती सभासदांना दिली. तसेच संस्थेचे ऑडीटर श्री. एस जे देशपांडे (सी ए गडहिग्लज) यांनी संस्थेची प्रगतीची माहीती व सन २०२४/२५ सालासाठी अ वर्ग दिलेचे जाहिर केले. संस्थेचे सभासद व शेळेवाडी गावचे सरपंच श्री. प्रविण पाटील यांनी संस्थेची शाखा -शेळेवाडी प्रगती व संस्था कामकाजाबद्दल सभाधान व्यक्त केले व श्री. आय डी कुंभार सर यांनी संस्थेच्या कामाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळीश्री लक्ष्मी नारायण प्रतिमेचे पुजन संस्थेचे सभासद आनंदा पोवार, डॉ. दगडू नारे, साताप्पा पाटील, एकनाथ बरकाळे व दिपप्रज्वलन सभासद नामदेव शिंदे, शंकर बरगे, मंगेश पाटील यांचे हस्ते करणेत आले व सभासदांच्या मुलांना फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये १० वी १२ वी मध्ये गुणवत्ता धारक पाल्यांचे संस्थेचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक यांचे हस्ते (रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह) देवून सन्मान करणेत आला. तसेच १० वी १२ वी मध्ये प्रथम क्रमांकासाठी संस्थेचे मयत सभासद कै. शंकर गणपती शिरगांवकर यांचे स्मरणार्थ श्री. दत्तात्रय शिरगांवकर यांचेकडून प्रत्येकी रोख रु.५००/- बक्षीस ही देण्यात आले. तसेच संस्थेची पिग्मी एंजट सौ. वैशाली वसंत पाटील यांची कन्या कु शर्वरी हीची महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे विद्युत सहाय्यक पदी निवड झालेने तिचा गौरवचिन्ह देवून सस्थेमार्फत सत्कार करणेत आला.
संस्थेचे जनरल मॅनेजर श्री नवनाथ डवरी यांनी अहवाल वाचन केले सभेत सुदर्शन हुंडेकर, नामदेव शिंदे, दिपक घोरपडे, विनायक हावळ, प्रशांत शहा, इ. सभासदांनी चर्चेत भाग घेतला. सभासदांचे आभार संचालक चंद्रकांत माळवदे यांनी मानले.
सभेत उपसभापती दत्तात्रय कांबळे संचालक दतात्रय तांबट अनंत फर्नांडीस, रविंद्र खराडे, विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे सौ. सुनिता शिंदे, सौ सुजाता सुतार, व श्रीमती भारती कामत यांच्यासह सचिव मारुती सणगर, मुख्य शाखा मुरगूडचे शाखाधिकारी सौ. मनिषा सुर्यवंशी, श्री तुकाराम दाभोळे (शाखा सेना कापशी) रामदास शिऊडकर (शाखा सावर्डे बुरा) बाळासो पाटील (शाखा कूर) के डी पाटील (शाखा सरयडे) श्री. राजेंद्र भोसले (शाखा शेळेवाडी) अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.