जीवनात यशस्वी होण्यासाठी तरुणांनी अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहावे – स.पो.नि. ज्ञानदेव वाघ

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे झिरो ड्रग्ज मशीन अंतर्गत राबविण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांमध्ये गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी महाविद्यालयातील आम्ली पदार्थविरोधी मोहीम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास त्यांनी अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील होत. त्यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना तरुणांमधील व्यसनवृद्धी आणि अमली पदार्थ विक्रीमध्ये तरुणांचा वाढत चाललेला सहभाग याबाबत चिंता व्यक्त करुन तरुणांना सजग राहाण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एच. एस. फरास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. तर, आभार प्रा. ए. आर. गावकर यांनी मानले.