कागल तालुक्यातील सोनगे येथे नागदेवता चौंडेश्वरी देवीची नागपंचमी यात्रा भक्तिमय वातावरणात साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सोनगे (ता. कागल) येथील क्षत्रिय नागदेवता चौंडेश्र्वरी देवीची नागपंचमी यात्रा उत्साहात पार पडली.
पहाटे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत अभिषेक, महापूजा काकड आरत्ती तसेच इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर दर्शनावसाठी खुले करण्यात आले . यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दर्शनासाठी पुरुष- स्त्री अशी स्वतंत्र व्यवस्था करणेत आली होती रांगेतून दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने गोकुळ दूध संघाचे चेअरमन अध्यक्ष श्री.नविद मुश्रीफ व संचालक श्री.अमरिश घाटगे यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे वाटप करणेत आले यावेळी उपसरपंच श्री जयसिंग पाटील , श्री.प्रदिप देवडकर, बाळासो पाटील, धनाजी पाटील, विलास कळंत्रे,भरत कांबळे बी.जी.कांबळे, उत्तम पाटील,सातापा कांबळे ,उपस्थित होते.
रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती त्यामुळे यात्रेला एक वेगळे स्वरूप आले होते.
यात्रेच्या निमित्ताने शिवकालीन शस्त्र संग्राहक अभ्यासक अमरसिंह पाटील यांच्या वतीने शस्त्र प्रदर्शन खुले करण्यात आले होते.
मुख्य रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा टू व्हिलर फोर व्हिलर अशी स्वतंत्र व्यवस्था केली होती त्याच बरोबर यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरगूड पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता यात्रा पार पाडण्यासाठी ग्राम पंचायत, सर्व तरुण मंडळे, तसेच ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.