मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेला १८ लाख १३ हजार नफा – सभापती किरण गवाणकर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथिल विश्वनीय संस्था म्हणून नावारूपास आलेली, सर्वपरिचीत आणि जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला १८ लाख १३ हजार नफा झालेची माहिती सभापती किरण गवाणकर यांनी दिली.
सभेच्या सुरवातीला दिपप्रज्वलन सभासद सुरेश जाधव , शिवाजी खंडागळे , तसेच प्रतिमापूजन मारुती घोडके , सुरेश परीट यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी मयत सभासद पुंडलिक पाटील भडगांवकर , दिनकर रणवरे , प्रदिप वेसणेकर ( संचालक ) , रामचंद्र पोळ , अलका तांबट , बाळकृष्ण येरूडकर ( मुरगूड ) बाजीराव शिंदे ( शिंदेवाडी ) , शंकर दाभोळे ( वाघापूर ),लता वखारीया ( निपाणी ) तसेच विविध क्षेत्रातील ज्ञात -अज्ञात व्यक्तींच्या निधनाने संस्था त्यानां मुकली आहे.त्याच्या पवित्र आत्म्यानां दोन मिनिटे स्थब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
नंतर उपस्थित सर्वांचे स्वागत करून गवाणकर म्हणाले संस्थेची सांपत्तिक स्तिथी भक्कम असुन अहवाल सालात संस्थेच्या ठेवी २० कोटी ६७ लाख ६४ हजार , कर्ज वाटप १७ कोटी ५७ केले असून वाटप केलेल्या कर्जापैकी निव्वळ सोने तारणावरील कर्ज ११ कोटी ६६ लाख ७८ हजारावर आहे . शिल्लक ठेवीची गुंतवणुक ६ कोटी २७ लाख ९२ हजारावर आहे . वार्षिक उलाढाल १३६ कोटी ९ लाख ७२ हजारावर झाली असून २०२४-२५ ऑडीट वर्ग ” अ ” मिळाला आहे.
संस्थेला निव्वळ नफा१८ लाख१३ हजारावर झाला आहे.अशी माहिती सभापती गवाणकर यानीं यावेळी दिली.
याप्रसंगी संचालक किशोर पोतदार म्हणाले संपूर्ण संगणकीकृत सेवा , जलद व तप्तर सेवा , आकर्षक व विश्वासार्ह कारभार , आकर्षक ठेव योजना , स्वमालकीची इमारत , कर्तव्यदक्ष संचालक मंडळ , सेवाभावी सेवक वर्ग अशी संस्थेची वैषिष्टे आहेत याचबरोबर पुढील काळात लवकरच संस्थेची अद्यावत व सुसज्य अशी इमारत बांधण्याचा संचालक मंडळाने निर्णय
घेतलयाचा मनोदय व्यक्त केला .
यावेळी १०वी १२वी सभासदाच्या गुणवत्ताधारक पाल्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला . त्याचबरोबर सोलापूर पुलगम कंपणीच्या राधीका स्पेशल चादरींचे सभासदानां भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले . कागल तालूका पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्धल कुरुकली येथील सुनिल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी कुस्ती कोच दादासो लवटे , नंदीनी साळोखे यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला .
अहवाल वाचन मॅनेजर सुदर्शन हुंडेकर यांनी केले.सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .
सभासद राजू कुडवे , श्रीकांत खोपडे , नवनाथ डवरी, चंद्रकांत माळवदे , सुनिल कांबळे , आकाश रेंदाळे , सुनिल सोनार यानीं चर्चेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती पाटील ( सर ) यांनी केले तर संचालक संदीप कांबळे यानीं आभार मानले.
यावेळी उपसभापती प्रकाश सणगर , संचालक सर्वश्री किशोर पोतदार , प्रशांत शहा , शशिकांत दरेकर , साताप्पा पाटील , हाजी धोंडीबा मकानदार , नामदेवराव पाटील , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव , कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह कर्मचारी वर्ग , महिला कर्मचारी, सभासद उपस्थित होते .