ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या सरपिराजीराव तलावाच्या सांडव्या वरती पुल व्हावा या मागणी साठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड शहराच्या पूर्व बाजूस सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेल्या तलाव आहे पावसाळ्यात मुरगूड शहरास पाण्याचा वेढा पडतो यावेळी या ठिकाणी असणाऱ्या तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येते या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळे मुरगूड भागातल्या लोकांना दिलासा मिळेल तसेच बरेच दिवस पाणी साचून राहते व शेवाळ निर्माण होते.या शेवाळावरुन अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचे काम दरवर्षी केले जात आहे हा रस्ता मुरगूड कापशी गडहिंग्लज तसेच बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीच व वाहतुकीचा आहे. ऊसाचे ट्रॅक्टर , ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सर्रास होत असते त्यामुळे सांडव्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी मुरगूड व मुरगूड भागातल्या लोकांची अनेक वर्ष करत आहेत.

यासाठी शासनाने लक्ष घालून या दोन्ही मागणी पूर्णत्वाकडे न्यावेत यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी नामदेव भराडे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कागल बाळासो भराडे,सरपंच दयानंद पाटिल सरपंच, कृष्णात भुरटे सरपंच सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks