शाहूनगर येथे वारकरी दिंडी उत्साहात साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहूनगर शिंदेवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी काढण्यात आली.या दिंडीत गावातील विठ्ठल भक्तांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,हरी ओम विठ्ठला असा विठुरायाचा जयघोष व टाळ्यांचा निनाद केला.
या दिंडीत विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करून, विठ्ठल -रुक्मीणिच्या तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज,संत जनाबाई अशा संतांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाचा करत त्यातून,”झाडे लावा,झाडे जगवा” असा वृक्षारोपणाचा संदेश देत जनजागृती करत दिंडी गावातुन फिरवण्यात आली. यावेळी दिंडीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दिंडीचा समारोप फुगडी खेळत,रिंगण सोहळ्यांनी झाला.
यावेळी प्रकाश मिसाळ, रामचंद्र इंदलकर ,रामचंद्र कणसे,अनिल आरेकर, विलास पोवार, जोतिराम तेलवेकर, सुनिल शेलार, सुनील कोळी,राजू दरेकर ,कृष्णात सुर्यवंशी,तानाजी कांबळे,भैरा परीट, बाळु पोवार,आनंदराव जलिमसर, संतोष काकडे, सुरेश धनगर यांचेसह शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते.