ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरण जतन व संवर्धनासाठी पळशिवणे येथे विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पळशिवणे ह्या निसर्गसंपन्न गावी जिल्हा परिषदेची मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय, वनविभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात देवशयनी आषाढी एकादशीच्या पावनदिनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस व अखेरीस 5 ते 6 फूट उंचीच्या 25 देशी वृक्षांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली.

सदर पर्यावरणपूरक उपक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करीत टाळांच्या गजरात अतिशय शिस्तबद्धरित्या सहभाग घेतला. सजवलेल्या पालखीत वड, पिंपळ ठेवण्यात आले. डोक्यावर तुळसकट्टा, विविध फळझाडे, हातात भगव्या पताका व पर्यावरणविषयक प्रबोधनपर फलक लक्ष वेधत होते. विठुमाऊलीच्या गजराबरोबरच झाडे लावा.. झाडे जगवा, वृक्ष लावा.. बाळगा अभिमान, तरच वाढेल वसुंधरेची शान.. अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनविषयक जाणीव जागृती निर्माण करणे, निसर्गचक्रातील झाडांचे महत्वपूर्ण योगदान, सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक मूल्यांचा समन्वय साधने, सामाजिक सलोखा जपणे, विद्यार्थ्यांच्या कृतीतून समाजात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणे, वृक्ष, वृक्षभेट, वृक्षसाक्षरता व वृक्षारोपण विषयक उपक्रम समाजात पोहचवत तालुक्यात वृक्षचळवळ गतिमान करणे हा उद्देश ठेऊन वृक्षदिंडीचे आयोजन पर्यावरणमित्र अवधुत पाटील व पळशिवणे गावचे पोलीस पाटील संजय पोवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बागुल व सूत्रसंचालन करडे यांनी केले. भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख, कृषी अधिकारी डवरी, मुख्याध्यापक अशोक आरडे, वनपाल मधुकर काशीद, वनरक्षक सारिका बेडगे, शिंदे, सरपंच अशोक कदम, माजी सरपंच विजय पोवार, उपसरपंच अशोक कुऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुनिल चांदेकर, प्रकाश कुऱ्हाडे, मारुती हचंनाळे, भरत कुराडे, एकनाथ कांबळे, श्री. आरेकर, ग्रामसेविका कळमकर, आदिती महिला CRP (समूह संसाधन व्यक्ती) माया अनिल वागरे, कृषी सखी सौ. रेश्मा युवराज पोवार, माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक दिलीप देसाई प्रमुख उपस्थित होते, आभार करडे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks