ताज्या बातम्या

मौनी महाराज सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मधुकर परीट तर व्हाईस चेअरमनपदी वैशाली वारके यांची निवड

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके :

बिद्री येथील श्री मौनी महाराज सहकारी पत संस्थेच्या चेअरमन पदी मधुकर बाळु परीट यांची तर व्हाईस चेअरमनपदी वैशाली दत्तात्रय वारके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सहकारी अधिकारी श्रेणी २ सहाय्यक निबंधक कागलचे एस. व्ही. तोडकर हे होते. संस्थेची नव्यानेच स्थापना झाली असून पहिल्याच वर्षी नुतन चेअरमन , व्हाईस चेअरमन निवडी करण्यात आल्या आहेत.
निवडीनंतर बोलताना नुतन चेअरमन मधुकर परीट म्हणाले, सर्व संचालक मंडळ आणि संस्थेच्या विश्वस्तांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीतच संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी सभासदाभिमुख योजना राबविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.
यावेळी संस्थापक व बिद्री गावचे उपसरपंच सागर कांबळे, मार्गदर्शक दत्तात्रय वारके, संस्थेचे संचालक अमोल चौगले,अजित पाटील, सुरज खोत, अक्षय पोवार ,निलेश पाटील,यशवंत नाटले, विजय वर्णे, कविता कांबळे,सानिका आरेकर यांच्यासह मयुर पाटील ,रोहीत परीट , नितीन पवार , पार्थ शेवाळे, सचिन खोत यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. सागर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. तर दत्तात्रय वारके यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks