ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर : सुहासिनीदेवी घाटगे ; जयसिंगराव घाटगे प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

“गुणवंत विद्यार्थी हे शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर असतात.त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन दि कागल सीनिअर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुरगूड व श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी प्रशालेसह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविले.

श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, या हेतूने सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शिक्षणसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज संस्था वटवृक्षासारखी बहरलेली आहे. त्यांच्या समाजवादी विचारांची आणि शैक्षणिक कार्याची प्रेरणा जपत, ट्रस्टच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध बक्षिस व प्रोत्साहन योजना राबविल्या जात आहेत.”

या कार्यक्रमात जयश्री वैराट आणि मृणाल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम,संजय नरके, युवराज पसारे, कर्नल डी.एस. मंडलिक, प्रशासकीय अधिकारी एम.व्ही. वेस्वीकर,सेक्रेटरी टी.जी.आवटे, टीएनसी अकॅडमीचे तानाजी चव्हाण, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण यांची उपस्थिती होती.

मुख्याध्यापक एस.डी. खोत यांनी स्वागत केले. सौ.जे. यु. पाटील व सौ.ए.एस.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सौ.एस.बी.सासमिले यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks