ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील लाभार्थ्यांनी व्यवसायासाठीच्या व्याज परतावा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील लाभार्थ्यांनी व्यवसायासाठीच्या व्याज परतावा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथे महाराष्ट्र शासन अंगीकृत वसंतराव नाईक आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत राजे बँकेमार्फत मंजूर झालेल्या कर्ज मंजुरी पत्र वाटपवेळी ते बोलत होते.

शिवनाकवाडी ता.शिरोळ( मुळ गाव तामंगाव ता.करवीर) येथील सुरेश काळे यांना पारंपारिक शेळी-मेंढी पालन व्यवसाय वाढविण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बॅंकेतर्फे भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील समाजासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या व्याज परतावा ( बिनव्याजी) वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले.राजे बॅंकेतर्फे या योजनेतून अर्थ सहाय्य घेणारे ते पहीले लाभार्थी आहेत.

घाटगे पुढे म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागाज विकास महामंडळ योजनेतून मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठ्यामध्ये राजे बँक अग्रेसर आहे.आता भटक्या-विमुक्त जाती जमातीमातीमधील तरुणांसाठीही कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासह पारंपारिक व्यवसाय वाढीसाठी या कर्ज योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

लाभार्थी सुरेश काळे यांनी पारंपारिक शेळी-मेंढी व्यवसाय वाढवण्यासाठी राजे बॅंके मार्फत केवळ महिन्याभराच्या अल्प कालावधीत सुलभपणे कर्ज मंजूर केल्यामुळे त्रेसष्ट मेंढ्या नव्याने खरेदी करता आल्याने घाटगे यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks