ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड विद्यालयाच्या वसतिगृह मोफत प्रवेशाचे आवाहन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या महात्मा गुरुकुल शासन मान्य विद्यार्थी वस्तीगृह मध्ये शैक्षणिक वर्ष सण 2025 -2026 साठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या गोरगरीब होतकरू आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे तरी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य एस .पी. पाटील व वस्तीगृह अधीक्षक निलेश शिंदे यांनी केले आहे. अनुसूचित जाती विमुक्त भटक्या जाती विशेष मागास व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हा प्रवेश पूर्णपणे मोफत असून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत भोजन व इतर शासना मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या जातात प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks