ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

बेनिक्रे ता.कागल येथे एकाच रात्रीत तीन बंद घरांचं कडी कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला.यामध्ये दोन घरातील तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकले तर एक घरातील कपड्यांचा ट्रंक फोडून साहित्य विस्कटून फेकले गेले आहे या तिन्ही घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही त्यामुळे तिन्ही घरे फोडून चोरटे हात हलवत गेले पण या चोऱ्यामुळे गावात घबराट पसरली आहे.पोलिसांनी आणखी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे

या बाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की; बेनिक्रे ता.येथील अशोक सदाशिव जाधव, वसंत सदाशिव जाधव हे दोघे भाऊ काही कामानिमित पुणे येथे गेले आहेत तर सोनाबाई महादेव ढेरे आपले घर बंद करून दुसऱ्याच्या घरी गेल्या होत्या एकाच गल्लीतील ही तिन्ही बंद घरे हेरून या घरांचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला यामध्ये जाधव बंधूंच्या दोन्ही घरातील तिजोऱ्या फोडल्या आहेत यामध्ये काही किंमती मिळतो का हे शोधण्यासाठी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकले आहे पण या दोन्ही घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही म्हणून त्यांनी त्याच गल्लीतील सोनाबाई महादेव ढेरे यांच्या बंद घराकडे मोर्चा वळवला तेथे पत्र्याची ट्रंक घराबाहेर शेजारील शेतवडीत फोडलला त्यामध्येही त्यांना काही हाती लागले नाही.

सकाळी घटनास्थळी जाऊन मुरगूड पोलिसांनी माहिती घेतली आहे.पुण्याला गेलेले जाधव बंधू गावी आल्यावरच यामध्ये चोरांच्या नेमके काय लागले काय हे कळणार आहे.पण या दोन्ही घरात मौल्यवान काही नव्हते असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks