संयुक्त शिवप्रेमी मुरगूड यांच्यातर्फे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात होणार साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड शहरातील संयुक्त शिवप्रेमी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा राज्याभिषेक सोहळा मुरगूड शिवतीर्थ पार पडतो. यावर्षी देखील भरगच्च अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली .
गुरुवार दिनांक 5 जून संध्याकाळी ठीक 5 वाजता गडपूजन कार्यक्रम बिरदेव मंदिर येथे पार पडणार असून बिरदेव मंदिर पासून शिवतीर्थ येथे शिवज्योत आणण्यात येणार आहे. यानंतर जागरण व गोंधळ कार्यक्रम संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे.6 तारखेस मुख्य दिवस राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या दिवशी पालखी सोहळा सकाळी ठीक सात वाजता अंबाबाई मंदिर ते शिवतीर्थ पर्यंत होणार असून पालखी शिवतीर्थ येथे आल्यानंतर विधीवत राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.यानंतर दुपारी 3 वाजलेपासून ट्रॅक्टर शोभायात्रा सजीव देखावा भव्य दिव्य शोभायात्रा , लेझीम पथक धनगरी ढोल व पारंपारिक ढोल 10 हलगी, 10 घुमकी दुपारी 3.00 पासून स्थळ अंबाबाई मंदिर पासून नाका नंबर 1 पर्यंत पार पडणार आहे.
यामध्ये अकलूज हलगी ( पोपट हलगी) मुरगुड मधील धनगरी समाजातर्फे धनगरी वादन ,जय श्री राम ध्वज पथक कागल मर्दानी खेळ ,रणमर्द आखाडा मुरगूड यांचे मर्दानी खेळ ट्रॅक्टरमध्ये शिवरायांची मूर्ती यांचे आकर्षण असणार आहे अशी शोभायात्रा पार पडल्यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आनंदोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये साई लाईट यांचा लाईट शो आणि भव्य आतिषबाजी पार पडणार आहे अशा भव्य दिव्य स्वरूपामध्ये राज्याभिषेक सोहळा मुरगुड शहरांमध्ये पार पडणार आहे.