ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
Gokul Chairman : अखेर ठरलं. ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड. सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचा यशस्वी तोडगा.
गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं राजकारण ढवळून निघालं. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा लागली होती.

कोल्हापूर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती. अनेक राजकीय चर्चाना सुद्धा वेग आला होता. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नविद मुश्रीफ (Navid Mushrif elected as Gokul chairman) यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान नविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे गोकुळमध्ये राज्यपातळीवरील हस्तक्षेप दिसून आला.