ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या २२ फूटी मूर्तीची भव्य मिरवणूक !

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

छ संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त मुरगूडमध्ये २२ फुटी छ . संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मुरगूड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .

या मिरवणूकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ‘ येसूबाई राणीसरकार व सईबाई राणीसरकार यांच्या वेशभूषा केलेल्या लहान मुलांचा घोड्यावर आरुढ झालेला सहभाग लक्षवेधी होता . तर धनगरी ढोल ताशा व प्रतिष्ठा लाईट हाऊसचा लाईट शो . तसेच एनएस साऊंड शो यांचे खास आकर्षण होते .

ग्रामदैवत अंबाबाई मंदीरापासून मान्यवरांच्या हस्ते मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली यावेळी सुहासिनींनी छ संभाजी महाराज यांच्या मूर्तीस औक्षण केले .मिरवणूक पाहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती २२ फुटी भव्य मूर्तीची छबी नागरिकांनी टिपली . तरुणाई या मिरवणूकीत उत्साहाने सहभागी होती .

या मिरवणूक प्रसंगी माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक ‘ आदमापूरचे सरपंच विजय गुरव ‘ विनोद उर्फ पप्पू चौगले ओंकार पोतदार सुरेश रामाणे श्रीकांत चौगले यदुवीर रावण हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks