मुरगूड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौतुक डाफळे नामदार चषकाचा मानकरी ; पै.आनंदा मांगले युवा चषक नरसिंह पाटील याने पटकावला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेता कौतुक डाफळे (पिंपळगाव) याने पुण्यामध्ये सराव करणाऱ्या आमशीच्या आंतरराष्ट्रीय मल्ल सुशांत तांबोळकर याला सात विरुद्ध दोन अशा गुण फरकाने पराभूत करत नामदार चषक पटकावला. कौतुकला नामदार चषक व रोख अडीच लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन सन्मानित केले.तर ५७ किलो वजनी गटात पै. आनंदा मांगले युवा चषक पै. नरसिंह पाटील (म्हारुळ) याने पटकावला तर पै. शेखर म्हामूलकर (साळवाडी) याने ४६ किलो वजनी गटात कुमार चषकावर आपले नाव कोरले.
कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील, भैया माने, युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, प्रकाश गाडेकर, मनोज फराकटे, रंगराव पाटील प्रवीण भोसले, सुनीलराज सूर्यवंशी, भूषण पाटील, विकास पाटील, रावसाहेब खिल्लारे, गणपतराव लोकरे उमेश भोईटे, बाबासाहेब पाटील असुर्लेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ना. हसन मुश्रीफ यांचे मनोगत झाले.
विविध वजनी गट निकाल पुढीलप्रमाणे :
22 किलो :
1.वरद पाटील (सरवडे)
2.श्रीविनायक चव्हाण (शिंदेवाडी)
3.वीर चव्हाण (दिंडनेर्ली)
4.गौरव मोरबाळे (मुरगूड)
25 किलो :
1. विश्वजित शिनगारे (तलंदगे)
2.आदर्श सुतार (निगवे)
3.समर्थ कांबळे (मुरगूड)
4.आर्यन दिवटे (मुरगूड)
30 किलो :
1युवराज कामण्णा (तळसंदे)
2श्रेयस दिवटे (शिंदेवाडी)
3 विराज पाटील (वाघुर्डे)
4 अभिमन्यू पाटील (केनवडे)
35 किलो :
1.रोहन शियेकर (कूशिरे)
2.प्रतीक पाटील (घानवडे)
3. श्रेयस पुजारी (तळसंदे)
4. शिवरुद्र चौगले
42 किलो :
1. शिवानंद मगदूम (सिद्धनेर्ली)
2. स्वराज्य कदम (पाचगाव)
3. आदित्य संभाजी मगदूम (भामटे)
4. रविराज पाटील (बानगे)
46 किलो : (कुमार चषक मानाची गदा)
1.शेखर म्हामुलकर (शाहूवाडी)
2. राजवर्धन पाटील (पाचगाव)
3. शिवाजी लिंगाप्पा शिरोळे (पट्टणकोडोली)
4. हर्षवर्धन शिंगे (केनवडे)
52 किलो…
1.प्रवीण घारे (तिटवे)
2.प्रतीक पाटील (पाचगाव)
3. श्रीकांत सावंत (भोसे)
4. समर्थ माळी (हुपरी)
57 किलो…आनंदा मांगले युवा चषक
1.नरसिंह पाटील (म्हारूळ)
2.प्रवीण वडगावकर (शेंडुर)
3.धनराज जमनिक (बानगे)
4.संकेत पाटील (पाडळी)
60 किलो….
1. मृणाल पाटील (बेले)
2.अतुल चेचर (पोर्ले)
3. तेजस पाटील (कोडोली)
4. सारंग पाटील (पाडळी)
65 किलो :
1. कर्णसिंह माने (राशिवडे)
2.आर्यन पाटील (राशिवडे)
3. सुशांत पाटील (म्हाकवे)
4. कौतुक शिंदे (मुरगुड)
74 किलो :
1.सौरभ पाटील (राशिवडे)
2.आकाश कापडे (आनुर)
3. साताप्पा हिरुगडे (बानगे)
4.निलेश हिरूगडे (बानगे)
खुला गट :
1. कौतुक डाफळे (पिंपळगाव)
2. सुशांत तांबोळकर (आमशी)
3.शशिकांत बोंगार्डे (बानगे)
4.मुंतजित सरनोबत (पुणे)
स्वागत मुरगूड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक पै. रवींद्र पाटील यांनी केले.यावेळी डॉ. सुनील चौगुले, अण्णा गोधडे, नंदकिशोर खराडे, युवराज सूर्यवंशी, अमित तोरसे, सत्यजित चौगुले, बाळकृष्ण मंडलिक, राजू चौगुले, सुनील कांबळे उपस्थित होते.