नामदार चषक कुस्ती स्पर्धेत शुभम सिदनाळे , सुशांत तांबोळकर कौतुक डाफळे ,मुंतजीत सरनोबत यांची दावेदारी ; मंत्री मुश्रीफांच्या वाढदिनानिमित्त मुरगूडमध्ये मैदान ; नामदार चषका’चा मानकरी ठरणार आज

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील शुभम सिदनाळे , कौतुक डाफळे , मुंतजीत सरनोबत यांची नामदार चषकासाठी दावेदारी असणार आहे .नामदार चषका’चा आज कोण मानकरी ठरणार याकडे सगळेचे लक्ष लागून राहिले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुरगूड येथे हे कुस्ती सामने आयोजित केले आहे. आज अंतिम लढत होणार आहे.
मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती नंदिनी साळोखे ( मुरगूड ), सृष्टी भोसले ( पिराचीवाडी ) ,BISF मध्ये निवड झालेले संकेत चौगले ( मुरगूड ) यांचा सत्कार करण्यात आला .
पुढच्या फेरीत प्रवेश केलेले मल्ल :
57 किलो गट :
संकेत पाटील ,शुभम रानगे ,
हर्षवर्धन जाधव ,प्रवीण वडगावकर ,धनराज जमनीक , ओंकार कुंभार ,नरसिंह पाटील
४२ किलो वजन गट :
रविराज पाटील , संस्कार माने , शिवानंद मगदूम ,शुभम (बानगे), स्वराज्य कदम ,ओमकार गोबुगडे ,आदित्य मगदूम
आज मुरगूड येथे कुस्ती बक्षीस समारंभा दिवशी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर राष्ट्रवादीच्या वतीने चांदीची गदा देवून सत्कार साजरा करण्यात येणार आहे .
स्पर्धेत पंच म्हणून संदीप पाटील, बाबा शिरगावकर , आनंदा गोडसे , आकाश नलवडे , वैभव तेली , महेश पाटील , पांडूरंग पुजारी व निवेदक म्हणून राजाराम चौगले यांनी काम पाहिले.