ताज्या बातम्यामहाराष्ट्र

यमगेच्या बिरदेव डोणे ची युपीएससीत बाजी ; कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

२०२४ मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळाचा मुलगा बिरदेव याने अवघ्या २७ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात ५५१ रैंकने उत्तीर्ण झाला. त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी बनणार आहे.

यमगे गावातील मेंढपाळ कुटुंबातील मुलगा बिरदेव सिद्धापा डोणे हा ‘आयपीएस अधिकारी झाले. आई-वडिलांच्या कष्टाचे चांगले फळ मिळाले बिरदेव याचा खडतर प्रवास आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता मेंढपाळ म्हणून व्यवसाय करत शेतशिवारात फिरस्ती करताना अनेक संकटांना सामोरे जात आसत.आपल्या मुलांनी शिकावे मोठे व्हावे अशी अपेक्षा उराशी बाळगून फिरस्ती करताना आई- वडीलांना आपला मुलगा मोठा आधिकारी झाल्याची आनंदाची बातमी समजली आणि त्यांचा आनंद गगनात मावेना….!

मंगळवारी दुपारी ‘यूपीएससी’ चा निकाल लागला. यमगे (ता. कागल) सारख्या खेडेगावातील मुलाचे यश लख्ख करणारे आहे. प्राथमिक शिक्षण यमगे येथे माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे, तसेच शिवराज विद्यालय जुनियर कॉलेज मुरगूड येथून विज्ञान शाखेत पदवी घेतलेल्या गरिब व होतकरू बिरदेव सिद्धाप्पा होणे हा धनगराचा अवध्या २६ वर्षाचा मुलगा देशात ५५१ व्या रैंक मध्ये यूपीएससी मध्ये यशस्वी झाला. पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला बिरदेव दिल्लीत युपीएससीचा अभ्यास करत होता. मंगळवारी निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव चे वडील सिद्धप्पा आणि आई बाळाबाई बकऱ्यांचा कळप घेऊ बेळगाव परिसरात होते , ही आनंदाची बातमी कळताच त्यांच्या डोळयात आनंदाचे अश्रू तराळले. परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बिरदेव डोणे याने यमगे गावाचं नव्हे तर कागल तालुक्याचं नाव लौकीक केल आहे. यमगे गावच्यावतीने मुरगूड शिवतीर्थ ते यमगे गावातील अंबाबाई मंदिरा पर्यंत भव्य मिरवणूक काढून त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात येणार आहे असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks