मुरगूडचे स्वप्नील ननवरे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र व जिद्द फाउंडेशन कोल्हापूर आयोजित राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन कोल्हापूर 2025 यांच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार” मुरगूड ता. कागल येथील स्वप्नील ननवरे यांना देण्यात आला.
अवयव दान जनजागृती व मदतनीस या कार्याचा आढावा घेऊन राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले.
अवयव दान जनजागृती आणि मदतनीस या कार्यास सात वर्षांत हृदय,डोळे, किडनी,फुफ्फुस, यकृत, बोन मॅरो, कॅन्सर अशा एकुण 35 रुग्णांचे प्राण वाचवले तसेच आज अखेर 30 पेक्षा जास्त रूग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक पाठबळ देण्याचे कार्य स्वप्नील करत आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रूग्णांना नवजीवन देण्याचे कार्य स्वप्निल ने केले. स्वतः दिव्यांग व मिळालेले अवयव रूपी नवजीवन समाजासाठी वापर करत आहे, व स्वत:ला या कार्यात झुकून घेत आहे.विविध राज्यस्तरीय संस्थांनी समाजरत्न, युवा समाजरत्न अशा राज्यस्तरीय पुरस्काराने आज रोजी गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळा सिनेमा अभिनेते स्वप्नील राजशेखर व अभिनेत्री शुभांगी गायकवाड, खासदार धनंजय महाडिक व प्रा.डॉ.बी.एन.खरात संस्थापक अध्यक्ष आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला.
हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केले बद्दल मी आभारी आहे तसेच हा पुरस्कार मी माझे कुटुंब माझा मित्र परिवार व मला जीवनदान देणारे डॉक्टर दिक्षित व त्यांची सर्व टीम यांना बहाल करत आहे. अशी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांनी अवयव दान करावे असे आवाहन स्वप्नील ननवरे यांनी केले.