ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागलच्या गटशिक्षणाधिकारी पदी धनंजय मेंगाने यांची नियुक्ती

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

गेले वर्षभर रिक्त असलेल्या कागल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पदी धनंजय रघुनाथ मेंगाने यांची नियुक्ती झाली आहे. या पूर्णवेळ नियुक्तीमुळे कागल तालुक्याच्या शिक्षण विभागाला गती येण्याची शक्यता आहे.

25 मार्च 2024 रोजी कागलचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर यांची सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते.याठिकाणी प्रभारी म्हणून विस्तार अधिकारी सारिका कासोटे यांची नियुक्ती झाली होती.

वर्षभरानंतर सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय मेंगाने (रा.निळपण ता.भुदरगड) यांची या पदावर निवड झाली आहे.मेंगाने यांची निवड ही एमपीएससी मार्फत असून त्यांचे शिक्षण बाई मेकॅनिकल झाले आहे.या पदाला पूर्ण वेळ माणूस मिळणे गरजेचे होते त्यानुसार प्रभारी कार्यकाळ संपून ही नवी नियुक्ती झाली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks