ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड येथील काशिलिंग बिरदेव मंदिरास मराठा वांलग यांच्याकडून 101 किलोचा हार अर्पण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड येथील काशिलिंग बिरदेव वार्षिक चैत्र यात्रा नुकतीच पार पडत आहे. या मंदिरास मराठा वालंग मंडळ यांच्याकडून 101 किलोचा फुलांचा हार अर्पण करण्यात आला. शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 पासून यात्रा सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पालखी सवाद्य ढोलांच्या गजरांच्या निनादामध्ये मंदिराकडे प्रस्थान करणार आले. सोमवार दिनांक 14 एप्रिल 25 रोजी मंदिरास मराठा मुरगुड मधील काही देणगीदारांच्या वतीने मंदिरास एकशे एक किलोचा हार अर्पण करण्यात आला.

यावेळी विजय गोधडे, सुशांत भोसले,आकाश डेळेकर,बाळकृष्ण चव्हाण रोहित मोरबाळे,सत्यजित शिरसेकर ओंकार जाधव, पांडुरंग मगदूम, अमोल पाटील, प्रशांत डेळेकर आदींच्या सहकाऱ्यांनी तसेच मानकरांच्या मानाची बकरी देवाला देण्यात आली.

संध्याकाळी पाच वाजता भाकणूककार तुकाराम पुजारी यांच्या भाकनुकीचा कार्यक्रम संपन्न झाला . आज मंगळवारी सर्व समाज आणि ग्रामस्थांच्या बकरी पडण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंदिरामध्ये दुपारी बारा वाजले पासून महाप्रसाद होणार आहे यानंतर सायंकाळी पालखी सांगता होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते.अशी माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली.

यावेळी जगन्नाथ पुजारी, साताप्पा मेटकर, विठ्ठल मेटकर ,महेश मेटकर ,सिद्राम मेटकर ,लक्ष्मण पुजारी,सागर पुजारी,राजेंद्र मेटकर,रामचंद्र पुजारी , सदाशिव पुजारी ,संदीप पुजारी , आप्पाजी मेटकर,सिद्राम पुजारी, पांडुरंग पुजारी , बीरदेव मेटकर , बाळासो शेळके,लखन पुजारी यांच्यासह सर्व धनगर समाज उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks