डॉ आंबेडकर यांचे सर्व जातीय भारतीय स्त्रियांवर न फिटणारे उपकार : डॉ भारती पाटील

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृतिदहन दिन आणि स्त्रीमुक्ती दिन म्हणून पाहिला जातो. खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांची गुलामी संपवण्याच्या महान कार्याची पायाभरणी डॉ.आंबेडकर यांनी या दिवशी केली. शिक्षण आरोग्याचा अधिकार,घटस्फोट, पुनर्विवाह,पोटगी,मतदान व वारसा हक्काचे अधिकार देऊन डॉ. आंबेडकर यांनी भारतीय स्त्रीला मनुस्मृतीतून मुक्त केले. भारतीय स्त्रियांवरचे डॉ. आंबेडकरांचे हे उपकार ऐतिहासिक आणि निर्णायक ठरले आहेत. असे उद्गार प्रा.डॉ. भारती पाटील यांनी काढले.
मुरगुड ता. कागल येथे समाजवादी प्रबोधिनी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अमर कांबळे ॲड.सुधीर सावर्डेकर कॉ.संतराम पाटील, उज्वला शिंदे समीरा जमादार प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भारती पाटील यांनी “डॉ. आंबेडकर आणि त्यांचे स्त्री विषयक चिंतन आणि कार्य” या विषयाची मांडणी केली.
डॉ. पाटील म्हणाल्या ,” जन्माला आलेले अपत्य त्याच जातीत जन्मले पाहिजे असे वंशसातत्य टिकवण्यासाठी स्त्रियांना बंधनात व गुलामीत ढकलण्यात आले.स्त्रियांच्या आणि अस्पृश्य बहुजन जातींच्या गुलामीचा प्रश्न हा मूलतः स्त्रियांच्या गुलामीच्या प्रश्नाशी निगडित आहे. बाई समाजाच्या खीजगणतीत नाही. ती स्वातंत्र्यहिन राहीली पाहिजे ही मनुची परंपरा सांगते. ती चंचल असते सगळ्या मंगळ गोष्टी तिच्यात असतात. म्हणून स्त्रीला स्वातंत्र्य नाकारले पाहिजे असा कुसंस्कार देणारी मनुस्मृति जाळून आंबेडकरांनी भारतात महान क्रांती केली,” असे गौरवोदगार त्यांनी काढले.स्वागत प्रास्ताविक डी डी चौगले, निवेदन समीर कटके तर आभार बी.एस.खामकर यांनी मानले.
यावेळी हरिश्चंद्र साळोखे, पांडुरंग दरेकर, कृष्णा कांबळे, शिवप्रसाद बोरगावे, सिकंदर जमादार, सदाशिव एकल, गणपती शिरसेकर,नारायण कांबळे, सदाशिव यादव, प्रदीप वर्णे,पांडुरंग गायकवाड,डी एम वणीक, अनिल आरडे, सदाशिव आरडे, मधुकर कांबळे, बाळासो जाधव, प्रवीण कांबळे, विशाल कांबळे, विक्रम कांबळे, विजय कांबळे, सुमन कांबळे, रुक्मिणी कांबळे, साधना भारतीय, संगीत मेहतर, माजी नगराध्यक्ष फुलाबाई कांबळे, छाया सोनुले, जयश्री कांबळे, ज्योती कांबळे, आदी मान्यवर व्याख्यानास उपस्थित होते.