ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागलचे राजकीय समीकरण बदलणार, माजी आ. संजयबाबा घाटगे यांचा आज ‘भाजप’ प्रवेश

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

कागल तालुक्याचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक संजयबाबा घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून मंगळवारी (दि.१५ एप्रिल) दुपारी अडीच वाजता मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रवेश होणार आहे. श्री घाटगे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र ‘गोकुळ’ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे ही भाजप प्रवेश करणार असल्याचे समजते. यामुळे कागल मधून भाजपला ताकद मिळणार मिळणार आहे. तर उबाटा शिवसेनेला धक्का समजला जातो.

माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची उबाटा शिवसेनेला कागल तालुक्यातून ताकद मिळाली होती. कागल तालुक्यात प्रत्येक गावात श्री घाटगे यांचा प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचा गट आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वरचष्मा पाहायला मिळतो.

पाचवेळा विधान सभा निवडणूकीत एक वेळा विजयी होत केवळ १३ महिन्याचा आमदारकीचा काळ मिळाला होता. पण कार्यकर्त्यांचा संच कमी झाला नाही. सत्ता असली नसली तरी गट बांधली चांगली राहिली. मध्यंतरीच्या काळात श्री अन्नपूर्णा शुगर व जागरी प्रकल्प उभा करून कार्यकर्त्यांना बळ दिले. एक हक्काचा कारखाना उभारला. विधानसभा निवडणूकीनंतर मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार घाटगे एकत्र येत एक नवी राजकीय जुळणी केली.

बिद्री कारखाना निवडणूक तसेच बाजार समिती निवडणुकीत एकत्र येत सत्तेमध्ये सहभागी होत कार्यकर्त्यांना संधी मिळवून दिली. यानंतर जिल्हा बँकेवर श्री घाटगे यांची स्विकृत संचालक म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी निवड करून राजकीय जुळणीचा बंध घट्ट केला.

यामागे झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात आघाडीत चांगले मताधिक्य मिळविण्यात मोलाचे योगदान दिले,

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचा राजीनामा देवून महाविकास आघाडीत प्रवेश आहे.त्यामुळे कागलमध्ये भाजपला पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपला ताकदवान नेता हवा होता. दोन ते तीन महिन्यापूर्वी भाजप प्रवेशाची श्री घाटगे चर्चा सुरू होती. मात्र राजकीय अडचणींचा ब्रेक लागत होता. अखेर मंगळवार १५ एप्रिल रोजी मंगळवारी अडीच वाजता श्री घाटगे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होत आहे. त्यामुळे कागलमधून भाजपला ताकद मिळली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks