ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सर पिराजीराव तलाव परिसरातील संस्थानकालीन हनुमान मंदिरात श्री.हनुमान जन्मकाळ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील संस्थानकालीन सर पिराजीराव तलाव परिसरातील श्री हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मकाळ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला.यावेळी राज्य साखर संघाच्या संचालिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, श्रीमंत सौ. नंदितादेवी घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने हभप अशोक कौलकर (गारगोटी) यांच्या प्रवचनाचा तर हभप श्रीरंग पाटील (हिरवडे खालसा) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले होते. सकाळी सूर्योदयाबरोबर श्री हनुमान जन्मकाळ उत्सव साजरा केला.त्यानंतर सुंठवठा वाटप केले.
यानिमित्ताने शिंदेवाडी, शाहूनगर, माधवनगर,यमगे येथील भजनी मंडळाचा संगीत हरी भजनाचा कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.