मुरगुड येथील काशिलिंग बिरदेव वार्षिक चैत्र यात्रा शनिवार (दि.१२) पासून सुरू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील ऐतिहासिक काशिलिंग बिरदेव वार्षिक चैत्र यात्रा शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पालखी सवाद्य ढोलांच्या गजरांच्या निनादामध्ये मंदिराकडे प्रस्थान करणार आहे.
सोमवार दि. १४ एप्रिल रोजी मानकरांच्या मानाची बकरी देवाला देण्यात येणार असून संध्याकाळी पाच वाजता भाकणूककार तुकाराम पुजारी यांच्या भाकनुकीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मंगळवार दि. (१५) रोजी सर्व समाज आणि ग्रामस्थांच्या बकरी पाडण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंदिरामध्ये दुपारी बारा वाजले पासून महाप्रसाद होणार आहे यानंतर सायंकाळी पालखी प्रस्थान होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यास हजारो भाविक भेट देणार आहेत. अशी माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली.
यावेळी जगन्नाथ पुजारी,साताप्पा मेटकर,लक्ष्मण पुजारी, सिद्राम मेटकर,सागर पुजारी,राजेंद्र मेटकर, रामचंद्र पुजारी ,महेश मेटकर सदाशिव पुजारी ,संदीप पुजारी , आप्पाजी मेटकर,सिद्राम पुजारी, पांडुरंग पुजारी,विठ्ठल मेटकर , बीरदेव मेटकर , बाळासो शेळके यांच्यासह सर्व धनगर समाज उपस्थित होता.