ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यासाठी बनणार वरदान, अनाजे प्रकल्पामुळे शेतकरी समाधानी ; शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार ,घरगुती वीजबिलही कमी होणार

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी पडीक नापीक शासकीय जमिनीवर कोल्हापूर जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा मिळणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्य शासनाने ग्रीन एनर्जीला महत्व दिले असून सौर ऊर्जा निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करण्यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या असून विविध माध्यमातून ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

विजेचे दर कमी व्हावेत , शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कमी करावा या उद्देशाने सौर ऊर्जा निर्मिती महत्त्वाची ठरले आहे, त्यामुळे महावितरण विविध माध्यमातून ऊर्जा निर्मिती करत आहे. शेतकरी घरगुती वीज वापर करणारे ग्राहक छोटे-मोठे व्यवसाय यांना या सौर ऊर्जा प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असून भविष्यामध्ये वीज बीलही कमी होणार आहेत त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान बनणार आहेत.राधानगरी तालुक्यातील अनाजे येथे ५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत असून अनाजे सह परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.

सद्या कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय जमिनीवर विविध ठिकाणी २ मेगावॅट ते ७ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यात येत असून याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी महावितरण तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून व सबंधित कंपनीकडून युद्धपातळीवर काम करून लवकरच प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वीजनिर्मितीसह रोजगारही उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांना जीवनदायिनी बनणारे हे सौर ऊर्जा प्रकल्प शासकीय जमिनीवर उभे करण्यात येत आहेत, मात्र काहीजणांकडून जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करून गैरसमज पसरवून सर्वसामान्यांना फायद्याचे असणाऱ्या या प्रकल्पांना खो घालण्याचा प्रयत्न केला जात आहे हे दुर्देवी आहे.

ज्या पडीक शासकीय जमिनी होत्या त्याचा काहीही उपयोग आज अखेर झाला नसताना त्यावरती आता जनतेच्या फायद्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी असलेला सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून ग्रामीण भागातील जनतेला सुखी व समृध्दी करत आहेत. यासाठी भविष्यातील वीजेची वाढती मागणी पाहता सदर प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने विचार करून सर्व स्तरातून याला सहकार्य होणे गरजेचे आहे, तरच शेतकरी सुखी , समृध्द व समाधानी होईल.

 

कोल्हापुरात सौरऊर्जा प्रकल्प उभारणे हे एक वरदान ठरू शकते, कारण यामुळे स्वच्छ ऊर्जा मिळेल, कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि पर्यावरणाची काळजी घेता येईल, तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल.
– हणमंत पवार – प्रकल्प अधिकारी

 

लोककल्याणकारी असलेले केंद्र व राज्य शासनाचे असे महत्वकांक्षी प्रकल्प उभे करण्यासाठी लोकप्रतिनिधीसह सर्वांनीच सकारात्मक विचार करून अशा प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे. तरच सर्वसामान्य जनता सुखी व समाधानी होईल व भावी पिढीला त्याचा फायदा होईल.
– समाधान म्हातुगडे – ग्रामपंचायत सदस्य सोनाळी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks