श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर 14 हून अधिक गाईंच्या वासरूंना कत्तली पासून जीवदान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
तिटवे (ता. राधानगरी) येथे कत्तलीसाठी मोठ्या संख्येने गाईची वासर डांबून ठेवली असलेची माहिती विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष प.पू.प्राणलिंग स्वामीजी विरूपाक्षलिंग समाधी मठ यांना मिळाली.स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना त्या वासरांना कत्तली पासून वाचवण्यासाठी आदेश दिला.यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सकल हिंदू समाज मुरगूड,सरवडे व पोलीस यांच्या मदतीने या वासरांना कत्तली पासून जीवदान देण्यात आले.
यावेळी MH 11 DD1643 या गाडीचा चीतथरारक गाडीच्या पाठलाग करून गोरक्षक न घाबरता मोठ्या हुशारीने ही गाडी मुधाळतिठ्ठा येथे पकडून कारवाई करण्यात आली. व त्या वासरांना जिजाऊ गोशाळा सावर्डे येथे पाठवण्यात आले.ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली.
यावेळी गोरक्षक शिवभक्त सर्जेराव भाट, तानाजी भरडे, प्रकाश पारिशवाड,सागर भाट,संकेत शहा, जगदीश गुरव यांनी या कारवाईत योगदान दिले.