ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवसेना सदस्य नोंदणीस दमदार सुरवात

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवकार्य सदस्य अभियान नोंदणी करणेसाठी कागल तालुका शिवसेना प्रमुख सुधीर पाटोळे यांनी यमगे, सुरुपली, कुरुकली, सोनगे, हमीदवाडा, बस्तवडे या गावी जाऊन जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करुन कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी खासदार संजयदादा मंडलिक व युवानेते ऍड. वीरेंद्रसिह मंडलिक यांचे हात बळकट करणेचे आवाहन केले. यावेळी त्याचे सोबत संजय गांधी निराधार योजना सदस्य साताप्पा कांबळे होते.प्रत्येक गावात शिवसेना सदस्य नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे, दोनच दिवसात सदस्य नोंदणी करनेचे अभिवचन यावेळी कार्यकर्त्यांनी दिले.