गगनबावड्यात १२ मार्चपासून दोन दिवसीय चर्चासत्र आणि राज्यशास्त्र परिषदेचे अधिवेशन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे दि. १२ आणि १३ मार्च २०२५ रोजी राज्यशास्त्र परिषदेचे अधिवेशन आणि दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई आणि सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांच्या शुभहस्ते होणार आहे.
पहिल्या सत्रात ‘लोकप्रशासनातील नवीन विचार प्रवाह व राज्यशास्त्राची बदलती भूमिका’ या विषयावर डॉ. वासंती रासम यांचे बीजभाषण होईल. या सत्राचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी पाटील तसेच संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भणगे असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती डॉ. अशोक चौसाळकर यांची असणार आहे. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. के. के. कावळेकर स्मृती व्याख्यानात साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. प्रकाश पवार हे ‘सकलजनवादी छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
तिसऱ्या सत्रात संशोधक विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचे सादरीकरण होईल आणि चौथ्या सत्रात शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेच्या कामकाजाची बैठक संपन्न होईल. दि. १३ मार्च रोजी ५ व्या सत्रामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे शोधनिबंध सादरीकरण होणार आहे. ६ व्या सत्रात मा. डॉ.भालबा विभुते यांचे ‘भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल ‘या विषयावर व्याख्यान होईल.
सातव्या सत्रात समारोपीय कार्यक्रम संपन्न होईल. या राज्यशास्त्र परिषद अधिवेशन आणि दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. श्रद्धा कोठावळे, सचिव डॉ. विजय देठे, प्रा. डॉ. रवींद्र भणगे, अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. शार्दुल सेलूकर, श्री. अनिल मोहिते, डॉ. अनिल पाटील, श्री. बळवंत जाधव, डॉ. वंदना सातपुते, श्रीमती छाया सकटे आणि श्री. सुनील गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. डॉ. वासंती रासम, प्रा. डॉ. भारती पाटील, डॉ. सिकंदर जमादार, प्राचार्य डॉ. शिरीष पवार, प्रा. डॉ. प्रकाश पवार, प्रा. डॉ. बाळासाहेब भोसले आणि प्राचार्य डॉ. व्ही. एम पाटील हे आमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये राज्यशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध पाठवून त्याचे सादरीकरण करावे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले आहे.