मुरगूड मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मूल्याधिष्ठित समाज निर्मिती साठी महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे उद्गार ब्रह्माकुमारी लता बहेन यांनी यावेळी काढले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया मार्फत साजरा करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.
प्रमुख उपस्थितांमध्ये विजयमाला मंडलिक हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.भारती सुतार व बँक ऑफ इंडिया मुरगूड शाखेतील अधिकारी सोनाली चौधरी यांचा समावेश होता.पती गमावल्याने वैधव्य प्राप्त झालेल्या किंवा पतीच्या दुर्धर आजारपणामुळे संसाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलणाऱ्या खालील कष्टाळू महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी सौ.वर्षा कांबळे,श्रीमती लता कुंभार,श्रीमती स्मिता जाधव,श्रीमती मंगल कोळेकर,श्रीमती उज्वला सोनुले,सौ.हौसाबाई कांबळे . ईश्वरीय सौगात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.