ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील यमगे येथे दोन मंदिरांचा वास्तूशांती समारंभ ; हसन मुश्रीफ यांच्याकडून ६१ लाखाचा निधी

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड-यमगे ता कागल येथील भैरवनाथ मंदिर आणि हनुमान मंदिर यांच्या नुतून वास्तू चे काम पूर्णत्वास गेले आहे.दोन्ही मंदिराचा वास्तू शांती समारंभ उत्साहात पार पडत आहे.या निमित्ताने गावात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.दोन्ही मंदिरासाठी आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तब्बल ६१ लाख निधी उपलब्ध करून दिला असून या दोन मंदिरांसह बिरदेव मंदिर आणि डोमारीन मंदिर या चारही मंदिराचे कळस मुश्रीफ फौंडेशन च्या माध्यमातून पूर्ण केले आहेत.

या चार ही मंदिरांच्या कलशाची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील भजनी मंडळांनी टाळ मृदंग च्या निनादात अभंग गायन करत या मिरवणुकीत रंगत आणली.या वेळी गावातील विविध भागात महिलांसह ग्रामस्थांनी या मिरवणुकीचे स्वागत केले.उद्या शनिवारी दोन्ही मंदिरांचा वास्तुशांती समारंभ पार पडणार आहे.यावेळी श्री क्षेत्र जोतिबा चे पुजारी जयवंत शिंगे,पुरोहित विश्वास झुगर,दीपक बहुधान्ये यांच्या उपस्थितीतीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.यादिवशीच सर्व माघारणींच्या हस्ते मंदिराला सूत गुंडाळण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.

तर रविवारी सकाळी नऊ वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे.तर दहा वाजता भाट नागणूर येथील बाळ महाराज यांच्या हस्ते चार ही मंदिरांचा कलशारोहन समारंभ पार पडणार आहे.दुपारी बारा वाजता महाआरती होऊन त्यानंतर महाप्रसाद पार पडणार आहे.त्याच दिवशी दुपारी माहेरवाशिणीची ओटी भरण्याचा कार्यक्रम ही पार पडणार आहे.रविवारी मंत्री मुश्रीफ सकाळी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks