ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरवडे येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पादुकांचे भव्य स्वागत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सरवडे ता . राधानगरी येथे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचे भव्य स्वागत करण्यात आले .या दिव्य सोहळ्यामध्ये “जिज्ञासा” प्री-प्रायमरी स्कूल, सरवडे, सावर्डेच्या बालकांचा वारकरी संप्रदायातील सर्व संताच्या वेशभुषेमुळे प्रत्येकांचे लक्ष वेधले.

विठ्ठल रुक्मीणी, भक्त पुंडलीक, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत नामदेव, संत एकनाथ, संतसेना महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, संत जळोजी-मळोजी, संत नरहरी सोनार, संत रोहीदास, संत गोरा कुंभार, संत तुकाविप्र, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत सखुबाई, संत जनाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत निर्मला, संत मीरा अशा वारकरी संप्रदायातील विविध संताच्या वेशभुषा साकारल्या होत्या.

या सर्व संताच्या वेशभुषेमधील जिज्ञासा संकुलाच्या बालसंताकडून संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे टाळ मृदंगाच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यासाठी जिज्ञासा संकुलाच्या संस्थापिका सौ. सुवर्णाताई बळीराम रेपे, सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, याचबरोबर पालक वर्गाने परिश्रम घेतले.

यावेळी संत जळोजी-मळोजी वारकरी संप्रदाय रेपे‌ गल्ली, शिवगर्जना तरूण मंडळ, तुकाराम महाराज स्मृती सोहळा व्यवस्थापण कमिटी, यांचे शाळा प्रशासनाकडून विषेश आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks