ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बाबासो उर्फ पिंटू भोई यांना समाजभूषण पुरस्कार

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
तिरुपती आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय भोई समाज संस्थेच्या प्रथम राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सन २०२४-२५ या वर्षाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ कोल्हापूर जिल्हा भोई समाज संस्थेचे अध्यक्ष बाबसो उर्फ पिंटू मधुकर भोई (जाधव) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय भोई समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथजी काटकर,राष्ट्रीय महासचिव गजानन दादा सटोटे तसेच गोपाल महाराज यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.