सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी विभागा तर्फे भित्तिपत्रिकेचे उद्घाटन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात विविध विभागांतर्गत अनेक अभ्यासपूर्ण उपक्रम घेतले जातात. त्यापैकी बी. ए. व बी.कॉम. भाग १ च्या इंग्रजी अभ्यासक्रमातील ‘डिस्क्रिप्शन’ या मॉड्युलवर आधारित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन शाहूपुरी कोल्हापूर येथील ॲपटेक अकॅडमीच्या प्रमुख मा. स्नेहा तिवारी, मॅनेजर निकिता आणि प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहा तिवारी यांनी या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आणि अशा उपक्रमांमध्ये नेहमी भाग घेण्याचे आवाहन केले. यामुळे त्यांच्या अभ्यासात आणि व्यक्तिमत्त्वात अमुलाग्र बदल होतो, असे त्या म्हणाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होडगे यांनी इंग्रजी विभाग, हा उपक्रम आयोजित करणारे इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा.विनोदकुमार प्रधान आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच, भविष्यातही असे आणखी उपक्रम घेण्याचे आवाहन केले.
ही भित्तिपत्रके कु. तनुप्रिया मांडवकर, कु. श्रावणी हळदकर, कु. राजनंदिनी मांगले, कु. सानिका पाटील, कु. साक्षी मोरे, कु. प्राजक्ता नादवडेकर, कु. दीप्ती शिंदे, कु. रजिया देसाई, कु. सोनाली पाटील, कु. अनुजा इंदलकर व कुमारी नम्रता शेणवी यांनी तयार केली.
या उपक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जोशी व प्रा. डॉ. सौ. पाटील यांचे मार्गदर्शन, तर प्रा. सारंग यांचे सहकार्य लाभले. एनसीसी च्या कॅडेट्सनी भितीपत्रके लावण्यास मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी बी.कॉम. भाग १ च्या कु. अनुजा इंदलकर हिने उपस्थितांचे स्वागत केले, तर कु. नम्रता शेणवी हिने आभार व्यक्त केले.
या उद्घाटन प्रसंगी प्रा. नितेश रायकर, प्रा. विश्वनाथ चौगुले प्रा. डॉ. एम ए कोळी, ते काम भाग १चे विद्यार्थी-विद्यार्थिनी व एनसीसी चे सर्व कॅडेट्स उपस्थित होते.