नंद्याळ मुक्काम एसटी सुरू करा , ग्रामपंचायतचा आंदोलनाचा इशारा

निकाल न्यूज से.कापशी प्रतिनिधी :
नंद्याळ ता.कागल येथे गेल्या ४० वर्षापासून चालू असलेली मुक्काम एसटी फेरी तात्काळ सुरू करण्यात यावी.अन्यथा २६ जानेवारी रोजी कागल आगार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नंद्याळ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
गेली अनेक दिवस बंद असलेली बस वारंवार लेखी तोंडी मागणी करून सुद्धा बस चालू होत नाही ही बस नंद्याळ, अर्जुनवाडा,हमीदवाडा,बस्तवडे ,आणूर,म्हाकवे या मार्गावरील आठ ते दहा गावातील प्रवासी नोकरदार,शाळकरी मुले,मुली, महिला यांनी एसटी सेवा सुरु करण्यासाठी मागणी केली आहे.त्याचबरोबर ज्या गावातून बस जाते त्या प्रत्येक ग्रामपंचायतीची मागणी सुद्धा निवेदनाला जोडली आहे.
तालुक्यातील लोकप्रतिनिधी व अनेक गावातील सरपंचांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आणि नंद्याळ मुक्काम गाडी सुरू झाली नाही.त्यामुळे प्रवासी, नोकरदार,शाळकरी व कॉलेजची मुले-मुली,ज्येष्ठ नागरिक,महिला यांची गैरसोय होत आहे.तेव्हा तातडीने लक्ष घालून एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनावर सरपंच मनिषा कांबळे, उपसरपंच लक्ष्मी कोराणे,आनंदा येजरे, प्रदिप करडे,संदीप सुतार,दत्तात्रय कांबळे,अर्चना शिंदे,माधुरी गौड , पद्मावती फगरे, वर्षाराणी पाटील आणि ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
कोरोना काळातील परिस्थितीमुळे तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागात एस टीची सेवा कोलमडली होती.तेव्हा पासून आज तागायत गेली ४० वर्षे चालू असलेली कोल्हापूर ते नंद्याळ मुक्काम गाडी बंद आहे.त्यासाठी गावातील युवकवर्ग, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.परंतु कागल आगारला येणारे अधिकारी अल्पकाळासाठी आल्याने त्याला गती मिळाली नाही.पण आता आर या पारच्या पाठपुराव्यासाठी लढा देणार आहोत.
येत्या 26 जानेवारीला ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचे प्रदिप करडे यांनी सांगितले.