ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे दिला जाणरा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कागल तालुक्यातील भडगाव येथील दै.पुढारी पत्रकार एकनाथ आप्पासो पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, ताज मुलाणी
सुधाकर निर्मळे, यांच्या प्रमुख उपस्थित अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला झाला. प्रारंभी दर्पणकार बाळाशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,म्हणाले “आव्हानांची चिंता करू नका. नवी आव्हान स्वीकारून आपले कर्तृत्व दाखवा व करिअर घडवा.जागतिकी करणामुळे आपण आपले राहिलो नाही, याचे भान ठेवून सावध पाऊल टाकायला हवे. एखाद्या विषयावर बातमी देताना दूरगामी परिणामांचा विचार करून सर्वांगाने विचार करून ती द्यावी. बातमीची दुसरी बाजूही मांडता आली पाहिजे,” असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

या वेळी संपादक निखिल पंडितराव म्हणाले, सोशल
मीडियापेक्षा प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास आहे. ही विश्वासार्हता जपण्यासाठी आपण जागरूकतेने कार्य
केले पाहिजे. पत्रकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जाऊन पत्रकारिता करतात. अशा पत्रकारांना पुरस्कार देऊन
गौरवण्यात येते. पुरस्काराने जबाबदारी वाढते. तंत्रज्ञान हे प्रिंट मीडियाला अतिशय पोषक आहे. काळाबरोबर आपण तंत्रज्ञान शिकून खमकी पत्रकारिता केली पाहिजे. सोशल मीडियाची माहिती खरी आहे की, खोटी आहे, हे तपासण्याची यंत्रणा उभी करावी लागते; पण प्रिंट मीडियाबाबत तसे होत नाही. आपली लेखणी ही सत्याच्या बाजूने असली पाहिजे. बातमीदार हा
कोणत्याही गटा-तटाचा किंवा पक्षाचा नसतो, तर तो आपल्या बातमीशी बांधील असतो.”यावेळी डॉ. विराट गिरी, ताज मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ‘जागल्या’ या स्मरणिकेचे व निबंधायन या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सदानंद कुलकर्णी, दगडू माने, भास्कर चंदनशिवे, निवास वरपे, प्रकाश तिराळे,
आदी उपस्थित होते. प्रा. रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले. पूनम चौगुले व अतुल मंडपे यांनी सूत्रसंचालन केले.उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks