ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड शहर भाजप अध्यक्ष पदी पृथ्वीराज कदम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहर भाजपा अध्यक्ष पदी प्रा पृथ्वीराज कदम यांची निवड करणेत आली आहे.आमदार सत्यजित देशमुख , भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव ,भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील ,अल्केश कांदळकर,कागल तालुका अध्यक्ष एकनाथ पाटील,भगवानराव काटे, उपाध्यक्ष एम. एम. चौगले तसेच सर्व वरिष्ठ भाजपा जिल्हा पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.कागल तालुक्यात आणि शहरात जि प पंचायत समिती,तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा विचार घराघरात पोहचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.