ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बी.जी.खराडे कॉलेजमध्ये आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वर्ग उत्साहात संपन्न !       

  

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते 

 कै. हनमंतराव उर्फ बी. जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिवाजी पेठ कोल्हापूर, शिक्षक प्रशिक्षणातील तात्त्विक व प्रात्यक्षिक भागातील मोठी दरी दूर करण्यासाठी आंतरवासितेची योजना दरवर्षी राबविण्यात येते. प्राचार्या डॉ. सी. जी. खांडके व इतर शिक्षक सहकारी सर्व मिळून आंतरवासीता टप्पा पार पाडतात.                    

 शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांचे आवश्यकतेनुसार दोन-चार गट करुन त्यांना आंतरवासितेसाठी निवडलेल्या शाळांवर पाठविले जाते. तत्पूर्वी त्यागटातून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते ती म्हणजे मुख्याध्यापकापासून ते शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यापर्यंत. आंतरवासिता कालावधी दरम्यान घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सूचना प्रशिक्षणार्थ्यांना आंतरवासिता नोंद वहीतून मार्गदर्शक प्राध्यापकांमार्फत दिली जाते. प्रत्यक्षात शाळेवर प्रशिक्षणार्थ्यांना पाठविण्यापूर्वी त्यांना कामाचे वाटप, आंतरवासितेचे उद्दिष्ट्ये आणि राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजनही करुन दिले जाते. आंतरवासितेत छात्रशिक्षकांना सलग अध्यापनाची संधी मिळते त्यामुळे त्यांचे अध्यापन परिणामकारक होण्यास मदत मिळते.

            आंतरवासीता टप्पा दरम्यान प्रबुद्ध भारत हायस्कूल, कोल्हापूर या शाळेमध्ये छात्र शिक्षक प्राजक्ता दुर्गुळे, ,पूजा माळी ,धनश्री फाले ,दीप्ती शिंदे ,संभाजी चौगले,प्रतीक्षा ठाकरे ,अंकिता बलुगडे ,सुजाता जम्बुरे ,रामदास वडाम ,वर्षा जाधव ,नक्षत्रा कोंडेकर ,ऋतुजा गायकवाड ,पुष्पा पाटील ,मेघा कांबळे ,तंजीला मनेर तसेच मार्गदर्शक डॉ. एम. आर. पाटील , प्रा. एस. ए. कांबळे उपस्थित होते. रामदास वडाम यांनी आभार मानले 

👍फोटो 👍बी.जी खराडे शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. डॉ. एम आर पाटील व प्रा एस ए. कांबळे यांच्या उपस्थित विद्यार्थी प्रशिक्षणार्थी वर्ग

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks