मेहतर,रूखी,वाल्मिकी समाजाने कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करून समाजासमोर ठेवला आदर्श…राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान यांनी दूरध्वनीवरून केले पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे कौतुक…

प्रतिनीधी:
मेहतर,रूखी,वाल्मिकी (स्वतंत्र विभाग) महाराष्ट्र राज्य, आणि उपेक्षित दलित सामाजिक परिषद या संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा व शहर शाखेच्या वतीने पारंपरिक होळीचा सन्मान करून होळीसाठी शेणींचा होणारा अनावश्यक वापर टाळून समाजा करिता आपलेही काही कर्तव्ये आहेत याची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकीतून पंचगंगा स्मशानभूमीस चार हजार शेणी दान केल्या.
नागरिकांच्या दु:खात सहभागी होत अंत्यसंस्कार सुरळीत पार पाडण्यासाठी कष्ट व जबाबदारी घेणारे कर्मचारी चेतन समुद्रे, बाबासाहेब भोसले, प्रणील कांबळे यांचाही फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी करण्यात आला.

संघटनेचे राज्य अध्यक्ष
मा.सुरेश तामोत
मा.जयेश कदम भाई
मा.आसकिन आजरेकर साहेब
यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास –
राज्य सचिव
मा.गौरव वालेकर
जिल्हा अध्यक्ष
मा.श्रीधर पंडत
जिल्हा अध्यक्ष
मा.सचिन पंडत
शहर अध्यक्ष
मा.नितीन कचोटे
सांगली जिल्हा अध्यक्ष
मा.रमेश लाड
यांच्यासह –
विनायक पंडत, अशोक पंडत,
रणजीत लाड, रमेश लाड,
मोहन सातारकर, बाळासाहेब लाड,
दीपक कागलकर
विशाल पंडत, दिनेश पंडत,
संदिप पंडत, महेश पंडत,
माणिक पंडत, प्रकाश लाड
शेखर पंडत, रमेश पंडत आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.