रमाई आवास योजनेच्या ६० घरकुलधारकांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप ; मंत्री श्री. मुश्रीफ यांचा घरकुलधारकांकडून कृतज्ञतापर सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथील रमाई आवास योजनेच्या ६० घरकुलधारकांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप झाले. त्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांचा घरकुलधारकांच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार झाला.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जातीचा बहुजन समाज माझे कुटुंब बनला आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठीच संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार आहे.
माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे म्हणाले. पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी गेली २० वर्षे रमाई आवास योजना शहरात राबविली आहे. त्यामुळेच झोपडपट्ट्या, पडकी, कौलारू जीर्ण झालेली घरे जाऊन एक हजाराहून अधिक कुटुंबे आरसीसी घरात राहत आहेत. एखाद्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीलाही लाजवेल, असे त्यांचे राहणीमान झाले आहे.
यावेळी कागल शहराचे माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, भगवान कांबळे, गणेश कांबळे, बच्चन कांबळे, तुषार भास्कर, सुरज कामत, दीपक कांबळे, राहुल कांबळे, मासूम कांबळे, रमेश घस्ते, एकनाथ घस्ते आदी प्रमुख उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत रमाई घरकुल मिळालेल्या नागरिकांची नावे अशी, स्मिता आदम कांबळे, अनिकेत दीपक कांबळे, नंदादीप प्रताप कांबळे, महावीर रामचंद्र कांबळे, प्रथमेश रमेश कांबळे, अमित बाळासो मदाळे, सिद्धार्थ सुरेश घस्ते, मीना दिलीप कांबळे, आशुतोष निशिकांत कांबळे, विशाल धनाजी कागलकर, अजित आत्माराम कांबळे, छबुताई यलगोंडा यादव, वैष्णवी विजय कांबळे, समीर किरण कांबळे, रेवती अरविंद कागलकर, महेश महादेव कांबळे, सतीश दशरथ कांबळे, सागर दिलीप कांबळे, अनिकेत मारुती कांबळे, वर्षा जितेंद्र कांबळे, सिद्धार्थ कुमार कांबळे, स्नेहल गणेश कांबळे, चंद्रकांत शरद कांबळे, सुरजकुमार विक्रम कामत, अलका दिलीप वाघमारे, रोहित दिलीप कांबळे, नागसेन मोहन कांबळे, नयन विकास घस्ते, अरविंद आदम कांबळे, ममता निल्लाप्पा कांबळे, यश सुनील कांबळे, हर्षद प्रकाश कांबळे, मेघा शंकर बन्ने, निखिल प्रमोद कांबळे, कोमल कौतिक कांबळे, शोभा सुधाकर कांबळे, श्रीनाथ एकनाथ घस्ते, विकी अशोक कांबळे, प्रकाश भोपाल घस्ते, संकेत बाळू घस्ते, ऋषिकेश शशिकांत कांबळे, अविनाश अशोक शितोळे, कुणाल नेताजी कांबळे, मधुकर मारुती कांबळे, रवी लक्ष्मण कांबळे, सुरेखा विठ्ठल कांबळे, प्रताप कृष्णात कांबळे, रेखा रमेश कांबळे, रघुनाथ दिनकर कांबळे, दादासो विश्वास घस्ते.