30 मार्चपासून आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवास प्रारंभ ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र,कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश,गोवा, अन्य राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव शनिवार ( दि.30 मार्च)ते मंगळवार (दि.7 एप्रिल) अखेर संपन् होत आहे. या भंडारा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ७ वाजता वीणापूजन होऊन हरिनाम सप्ताहास, भंडारा उत्सवास प्रांरभ होईल. नित्याचे कार्यक्रम, पहाटे ४ ते ५ श्रींची समाधी पूजन,सकाळी ५ ते ६ काकड आरती, दुपारी ४ ते ५:३० हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, सायंकाळी सात वाजता आरती,रात्रौ ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हरिजागर होणार आहे.
प्रवचनकार व कीर्तनकार ३० मार्च रोजी प्रवचन ह.भ.प. अशोक कौलवकर( गारगोटी)तर कीर्तन सेवा ह भ प बी जी सुतार (उंदरवाडी) रविवार ३१ मार्च प्रवचन ह भ प रणजीत भारमल (अवचित वाडी)तर ह भ प बाळकृष्ण गिरी (कूर)यांचे किर्तन , सोमवार १ एप्रिल ह भ प विनय कुलकर्णी (मुरगुड )यांचे प्रवचन तर ह भ प अर्जुन जाधव( तवंदी )यांचे किर्तन , मंगळवार ०२ एप्रिल ह भ प पुंडलिक गवळी (औरनाळ)यांचे प्रवचन तर ह भ प विष्णू खोराटे (सरवडे)यांचे किर्तन ,बुधवार ०३ एप्रिल ह भ प नानासो द. पाटील (आदमापूर)यांचे प्रवचन तर नानासो शि. पाटील (आदमापूर)यांचे किर्तन ,गुरुवार ४ एप्रिल ह भ प रामचंद्र पाटील (आदमापुर)यांचे प्रवचन तर किर्तन ह भ प भानुदास रा.कोल्हापुरे (इस्लामपूर) यांचे किर्तन ,शुक्रवार ०५ एप्रिल रोजी ह भ प मृत्युंजय स्वामी महाराज (शेंद्री)यांचे प्रवचन तर ह भ प बाळकृष्ण परिट यांचे किर्तन होईल
मृदंगसाथ हभप श्री वेद नादब्रह्म पखवाज क्लासेस आदमापुर कोल्हापूर
यासाठी परिसरातील कडगाव, गडहिंग्लज, औरनाळ ,व्हनगुती, नरतवडे, आदमापूर ,यमगे, हरळी, मुदाळ, हनीमनाळ मडिलगे खुर्द, कुर, निढोरी, धामोड, पुंगाव, कपिलेश्व,र सरवडे, निळपण, हरगापूर, मालवे, बोरवडे, ह भ प भजनी मंडळ कमलेश्वरधारा भक्ती संगीत गोवा, शिंदेवाडी ,मांगेवाडी, कोनवडे आदी भजनी मंडळांची साथ लागणार आहे.
बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव पहिला दिवस हा शुक्रवार दि ५ एप्रिल जागर असून शनिवार दिनांक ०६ एप्रिल या दिवशी पहाटे चार वाजता बाबुराव डोणे वाघापूर यांचा मुलगा कृष्णात डोणे यांची भाकणूक होईल व महाप्रसाद होईल. रविवार दिनांक ७ एप्रिल रोजी पालखी सोहळा व दुपारी प्रसाद व यात्रा सांगता होईल. सदर कार्यक्रम भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सद्गुरु बाळूमामा देवालय, प्रशासकिय समिती सदस्य रागीणी खडके व ग्रामस्थ यांनी केले आहे.