ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती बंधनकारक ; NMC चे निर्देश

नॅशनल मेडिकल कमिशनने (National Medical Commission) सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) शिक्षक आणि विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. मंगळवारी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन बैठक घेतल्या (Principal online meeting) नंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयातील शिक्षकांची उपस्थिती बायोमेट्रिक मशीनद्वारे (teachers attendance biometric) नोंदविण्यात यावी, तसेच पदवी आणि पीजी परीक्षेचा व्हिडिओ तयार करून तो आयोगाला पाठवावा, असे निर्देश NMC ने दिले आहेत. तसेच कोणत्याही महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्था चांगली नसेल तर तेथील जागा कमी होतील, असा इशाराही आयोगाने दिला आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार आयोगाने म्हटले आहे की, “महाविद्यालयाची तपासणी यापुढे नियमितपणे केली जाणार आहे. प्राचार्य सर्व कागदपत्रांची पडताळणी करतील आणि एनएमसी पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी लवकरच नवीन पोर्टल तयार करण्यात येत आहे. तसेच, आयोगाने निर्देश दिले की पीजी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक लॉग बुक बनवावे, ज्यामध्ये पीजी विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन कामाचा तपशील लिहून त्यांच्या मार्गदर्शकाकडून त्याची पडताळणी करतील.

आयोगाने विद्यार्थ्यांच्या मार्किंग सिस्टीम मध्येही बदल केले आहेत. पूर्वी थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 50 गुण आवश्यक होते. आता नवीन बदला नुसार एखाद्या विद्यार्थ्याला एका विषयात 40 आणि दुसऱ्या विषयात 60 गुण मिळाले, तरी तो उत्तीर्ण मानला जाईल.

दरम्यान यावर्षी 25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षा 2024 साठी अर्ज केले आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, NTA ने NEET UG नोंदणीची अंतिम तारीख 16 मार्चपर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत पुढील तीन दिवसांत आणखी विद्यार्थी NEET साठी अर्ज करू शकतील.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks