ताज्या बातम्यामहाराष्ट्र
एसटी महामंडळाची अयोध्या दर्शन यात्रा ; सोबत काशी, प्रयागराज व शेगाव सुध्दा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी अयोध्या यात्रेची शानदार सोय केली आहे.यामध्ये काशी विश्वनाथ ,प्रयागराज व शेगाव या तिर्थक्षेत्रांचा सुध्दा समावेश आहे. ४० प्रवाशांसाठी उत्तम आरामशीर बस असणार आहे.त्यामध्ये पुशबॅक सीट्स ची सोय असलेले दीर्घ प्रवासात रेलून किंवा झोपून विश्रांती सुध्दा घेता येते.
प्रवास भाडे ७००० + निवास व भोजन ३००० असा एकूण मानसी १०,००० रू.पर्यंत खर्च येईल.निवास व भोजन अल्प दरात सोय करणेत येईल. या सुवर्ण संधीचा फायदा प्रवाशांनी घ्यावा. त्यासाठी आपापल्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधावा असे एस टी महामंडळाचे पी.आर.ओ अभिजित भोसले यांचे मार्फत कळविण्यात आले आहे.