ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथे विवाहितेची गळपास घेऊन आत्महत्या

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील हसूर खुर्द त येथे विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाचे दरम्यान घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे .
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी : विक्रम कृष्णा मस्कर व पत्नी सौ जानकी विक्रम मस्कर(२९) यांचेसह हे संभाजी दतू मसकर यांच्या घरी भाड्याने राहत होते. मंगळवारी सकाळी दहा ते एकचे दरम्यान या भाड्याच्या घराच्या आतील बाजूच्या खोलीत तुळईला ओढणीने गळपास घेऊन जानकीने आत्महत्या केली . घटनेची वर्दी जानकीचे पती विक्रम मसकर यांनी पोलीसात दिली. मुरगूड पोलीस पुढील तपास करीत आहेत.